
लोहारा (जि. धाराशिव): अल्पवयीन मुला-मुलीवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटाना थांबण्याचे नाव घेत नाहीत. लोहारा तालुक्यातील एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (ता. २९) एका २५ वर्षाच्या तरूणाने १२ वर्षाच्या शाळकरी मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे तालुक्यात संतापाची लाट असळली आहे. दरम्यान, पीडित अल्पवयी मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलिस ठाण्या सोमवारी (ता. ३०) आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावात बारा वर्षाचा मुलगा आपल्या आई, वडील आजी-आजोंबासोबत राहातो. येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवी वर्गात शिक्षण घेत आहे. मोलमजुरीवरच कुटुंबाच्या उदर्निवाह चालतो. त्यामुळे रविवारी सकाळी घरातील आज्जी वगळता सर्वजण सोयाबीन काढण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात मजुरीने गेले होते. शाळेला रविवारची सुट्टी असल्याने मुलगा दिवसभर घरी होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगा व त्याचा मित्र असे दोघे मिळून घराजवळ असलेल्या शेतात शौचासाठी गेले होते. शौच उरकून परत येताना गावातीलच आरोपीने पीडित मुलाच्या मित्राला दूरवरूनच दगड मारून त्याला हाकलून दिले. त्यानंतर जवळ येऊन अल्पवयीन मुलाच्या हाताला धरून तुरीच्या पिकात नेऊन त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला. त्रास होत असल्याने पीडित मुलाने मजुरी करून सांयकाळी सात वाजता घरी आलेल्या आई वडिलांना घडलेला दुर्दैवी प्रकार सांगितला. पीडित मुलाने लोहारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपीविरूध्द पोक्सो, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार अधिक तपासकरीत आहेत.




