ईतर

लोहारा शाखेत युनियन बँकेचा १०५ वा वर्धापनदिन उत्साहात

लोहारा (जि. धाराशिव): युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेचा १०५ वा वर्धापन दिन लोहारा शहरातील बँक शाखेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेला १०५ वर्ष पूर्ण झाली. बँकेने ग्राहकांना तत्पर आणि उत्तम सेवा देऊन विश्वासहर्ता निर्माण केली आहे. वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी लोहारा शाखेत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक संदीप विजयकुमार पुरी, बँक ग्राहकांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी सहायक शाखा व्यवस्थापक ऋषिकेश जोशी, विशेष सहायक विकास जाधव, लिपिक विशाल बिरादार, रोखपाल दामोदर सूर्यवंशी, बसय्या स्वामी, एम. डी. लोहार, पत्रकार बालाजी बिराजदार, अनुज बिराजदार, डॉ. जितेंद्र मेटे, सचिन फताटे, युनियन बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालक अशोक दुबे, यांच्यासह बँकेचे खातेदार, ठेवीदार, हितचिंतक, व्यापारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close