ईतर

आष्टाकार येथे ६५ सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

आष्टाकासार ग्रामपंचात, ग्रामस्थांच्या वतीने केला सत्कार

आष्टाकासार (जि. धाराशिव): लोहारा तालुक्यातील आष्टाकासार ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामस्थांच्या वतीने गावातील सुमारे ६५ सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुदावाडी येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे होते. भगीरथ कुलकर्णी, महादेवप्पा नरे, सरपंच सुलभा कांबळे, उपसरपंच वसंतराव सुलतानपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्कार सोहळ्यात सेवानिवृत्त शिक्षकांचा ट्रॉफी, शाल, श्रीफळ व बुके देऊन सहपत्नीक सत्कार करण्यात आला. प्राचार्य ते अंगणवाडी सेविका, सेवानिवृत्त शिक्षक सहपत्नी हजर होते. समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे बोलताना म्हणाले की, सेवानिवृत्त शिक्षकांनी टिव्ही, मोबाईलच्या भयानक लागलेल्या व्यसनातून मुलांना वाचवण्याचा उपक्रम हाती घ्यावा. प्रत्येक पाल्यांनी दररोज संध्याकाळी आपल्या गावातील टीव्ही व मोबाईल दोन तास बंद ठेवून आपल्या पाल्यांचा अभ्यास घ्यावा. त्यांच्यामध्ये अभ्यासाची आवड निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नाना गुरुजी, महादेव नरे गुरुजी यांनी आजचा शिक्षक व शिक्षण पद्धती आणि समाज याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी मुंबई, पुणे, सोलापूर, पंढरपूर, लातूर, उस्मानाबाद, उमरगा आदी ठिकाणी मुलांच्या नोकरीसाठी नातवाच्या शिक्षणासाठी स्थलांतरित झालेले आष्टाकासार नगरीचे सेवानिवृत्ती शिक्षक आवर्जून आपल्या माय भूमीत या भव्य सत्कार सोहळ्याला हजर होते. विष्णूपंत सगर, कांतराव सोमवंशी यांनी सत्कार केल्याबद्द कृतज्ञता मनोगतातून व्यक्त केली. सरपंच कांबळे, उपसरपंच सुलतानपुरे यांनीही आपले विचार मांडले. संकल्पना उपसरपंच वसंतराव सुलतानपुरे यांची होती. ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी सिद्रामप्पा तडकले, माजी सरपंच सुनील सुलतानपुरे, विष्णुपंत सगर, सरपंच सुलभा कांबळे,ग्रामविकास अधिकारी मातोळे, सदस्य‌, कर्मचारी व ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला. यावेळी नितीन अष्टेकर, अमोल सोमवंशी, पंढरी पाटील, चतुर्भुज कागे, सतीश मोटे, खाजा खैराटे, सुभाष शिदोरे, मुकेश सोमवंशी, अरविंद पोतदार,उपस्थित होते. दीपाली बलसुरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. आभार नितीन अष्टेकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close