ईतर
काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली

लोहारा (जि. धाराशि): माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्याबद्दल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील पक्ष कार्यालयात शुक्रवारी (ता. २७) सामूहिक श्रध्दांजी वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी माजी पंतप्रधान सिंग यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढा घेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी तालुकाध्यक्ष शामसुंदर तोरकडे, ओबीसी विभाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गाडेकर, मुकेश सोनकांबळे, माजी सरपंच व्यंकट रसाळ, इस्माईल मुल्ला, रौफ बागवान, बसवराज पाटील, प्रवीण बोंदाडे, कमलाकर बिराजदार, शरणप्पा शेगजी, साहेबलाल शेख, तुकाराम वाकळे, बाबुराव डोंबे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.





