
लोहारा (जि.धाराशिव): मराठा समाजाला आरक्षण दिले जात नसल्याने उद्विग्न झालेल्या माडज (ता.उमरगा) येथील एका तरूणाने जलसमाधी घेतली आहे. याचे शहरासह तालुक्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने आज गुरूवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन करून मराठा समाजाला तत्काळ आरक्षण लागू करावे, अशी मागणी करीत टायरला आग लावून राज्य सरकारचा निषेध केला. दरम्यान, एका युवकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आंदोन कर्त्यांनी व पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून युवकाला रोखले त्यामुळे अनर्थ टळला. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सारटी या ठिकाणी मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मागील दहा दिवसांपासून प्राणांतिक उपोषण करीत आहेत. शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोन पोलिसांनी चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. याला विरोध करताच पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांवर लाठीहल्ला केला. यात महिला, लहान मुलं जखमी झाली. याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. सकल मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी शहर, गाव बंद, रास्ता रोको ठिय्या, धरणे आंदोलन करण्यात आली. परंतु राज्य सरकारने अद्यापही आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस भूमिका न घेता बोटचेपी धोरण अवलंबिल्यामुळे मराठा समाजामध्ये राज्य सरकारच्या विरोधात असंतोष पसरला आहे. त्यातच उमरगा तालुक्यातील माडज येथील किसन माने या अवघ्या तीस-बत्तीस वर्षाच्या तरूणाने आरक्षण लागू केले जात नसल्याने बुधवारी तलावात उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने संतप्त झालेला सकल मराठा समाज राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन करून रस्ता रोखून धरला. तब्बल दीड तास आंदोलनामुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी टायरला आग लावली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने लाखांचे मोर्चे काढण्यात आली. आरक्षणासाठी कुटुंबांच्या उदर्निनिर्वाहाची परवा न करता अनेकांनी आपले बलीदान दिले. तरीही राज्य सरकार आरक्षण देत नाही. आरक्षणासाठी आणखी किती जणांचे बळी घेणार? असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित करून यापुढे आम्ही आमच्या जिवाचे बरे वाईट करून घेणार नाही तर मंत्री, पुढाऱ्यांच्या गाड्या जाळू असा सज्जड इशारा देत आरक्षण मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. यावेळी रंजना हासुरे, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड. दीपक जवळगे, बाजार समितीचे माजी सभापती दीनकर जावळे-पाटील, स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात, युवा नेते नितीन जाधव, सचिन रणखांब, यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त करून राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी नगरसेवक प्रशांत काळे, युवा सेनेचे शहरप्रमुख श्रीकांत भरारे, अनिल मोरे (हिप्परगा रवा), संभाजी ब्रिगेडचे महेश गोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रसचे नाना पाटील, मार्डीचे माजी सपंच नरदेव कदम, माजी नगरसेवक अभिान खराडे, बाळासाहेब पाटील, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, चिंचोलिचे उपसरपंच पवन, बालाजी जाधव (मोघा), प्रकाश भगत, नितीन पाटील, गोकर्णा कदम, सचिन रणखांब, शरद पवार, चंद्रशेखर जावळे, अविनाश गोरे, शुभम रसाळ, आकाश एरनोळे, सुशांत शिंदे, बाळासाहेब लोमटे, दत्तात्रय मुळे, बालाजी मुळे, तानाजी पाटील, परमेश्वर जाधव, कृष्ण पाटील, अमित देशमुख, संजय मुरटे, बळी गोरे, सचिन गोरे , श्रीहरी सावंत, अविनाश शिंदे, जीवन गोरे, दत्ता घाडगे, अविनाश गोरे, तुळशीदास शिंदे नितीन गोरे, सहादेव गोरे, योगेश गरड, सुरज कदम, शैलेश चंदनशिवे, सुभाष कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ठिय्या आंदोलन संपल्याचे जाहीर होताच नितीन जाधव या तरूणाने “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे” अशी घोषणा देत अचानक सोबत आणलेली पेट्रोलची बाटली त्यांनी अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी नितीन जाधव या तरूणाला वेळीच रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

