ईतर
लोहारा तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

धाराशिव: उस्मानाबद (धाराशिव) जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या लोहारा तालुका पत्रकार संघाची जम्बो कार्यकारणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सरचिटणीस भिमाशंकर वाघमारे यांनी जाहीर शुक्रवारी (दि. ३) केली आहे.
लोहारा तालुकाध्यक्षपदी बालाजी कांत बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी सदाशिव आणेबा जाधव, कार्याध्यक्षपदी महेबूब इस्माई फकीर, सरचिटणीसपदी सुधीर विश्वनाथ कोरे, कोषाध्यक्षपदी जसवंतसिंह करणसिंग बायस यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणीमध्ये सहकोषाध्यक्ष बसवराज अण्णाप्पा होनाजे, प्रसिद्धी प्रमुख गणेश वसंत खबोले तर सदस्य म्हणून नीलकंठ शाहुराज कांबळे, तानाजी ज्ञानेश्वर माटे, गिरीश प्रकाश भगत, कालिदास विश्वनाथ गोरे, जगदिश सुरवसे, अब्बास रशिद शेख, यशवंत दत्तू भुसारे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लोहारा तालुका पत्रकार संघ नेहमीच अग्रेसर असतो. या नुतन कार्यकारणीच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

