आष्टाकासार जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

आष्टाकासार (जि. धाराशिव): तालुक्यातील आष्टाकासार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सुलभा कांबळे, उपसरपंच वसंतराव सुलतानपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यश मुरमे, सुकन्या सुतार, तनुजा फुंडिपल्ले, ॠतुजा फुंडिपल्ले, मंथन तडकले, अथर्व गिरी, शिवम मुरमे या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करून गुरूजनांबद्दल आदर व्यक्त केले. त्यानंतर वसंत सुलतानपुरे, काशीनाथ घोडके, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश मुरमे, यांनी आपले विचार व्यक्त केले. तर मुख्याध्यापक सुभाष नागणे व, एकनाथ शिंदे यांनी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहीती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलभीम क्षीरसागर यांनी केले. तानाजी सुरवसे यांनी आभार माले. कार्यक्रमास जयंत अष्टेकर, श्रीमती नागणे, श्रीमती बेले, स्वप्नील सोनवणे, वैजनाथ स्वामी यांच्याह पालक उपस्थित होते.

