भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील माकणी येथील शुभम साठे यांची भाजपच्या जिल्हा युवा वॉरीयर्स सहसंयोजकपदी निवड झाली आहे. जेवळी दक्षिण येथील बालाजी चव्हाण यांची युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तर हिप्परगा (रवा) येथील मुरलीधर होनाळकर यांची युवा मोर्चा जिल्हा चिटणीसपदी तर बुद्धीजीवी जिल्हा संयोजकपदी प्रमोद पोतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शहरातील कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. २३) सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष इक्बाल मुल्ला, भाजपचे तालुका सरचिटणीस दगडू तिगाडे, मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादाभाई मुल्ला, रामेश्वर जाधव, दाऊद शेख, अदी उपस्थित होते.





