विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत वसंतदादा पाटील हायस्कूलचा दबदबा

लोहारा (धाराशिव): नांदेड येथे पार पडलेल्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाच रजतपदक पटकाविले आहे. विजेत्या खेळाडूंचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. नांदेड येथील श्रीराम गडीया वेटलिफ्टिंग क्लब वजिराबाद येथे विभागीय स्पर्धा घेण्यात आल्या. वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी वसंतदादा हायस्कूलचे विविध वजन गटातील पाच विद्यार्थी सहभागी झाले होते. १९ वयोगटातील मुलींच्या ४५ किलो वजन गटात प्राची गोरे हिने द्वितीय क्रमांक पटकावून रजतपदक मिळविले. सतरा वयोगटात ४० किलो वजन गटात सपना भोकरे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच सतरा वयोगटात ५५ किलो वजन गटात अंकिता सूर्यवंशी हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबर ५९ किलो वजन गटात प्रणाली माने या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. नांदेड जिल्हा क्रीडाधिकारी शिरसकर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना रजतपदक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थिनींनी पाच रजतपदक मिळविल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला पाटील यांनी सत्कार केला. यावेळी धनराज धनवडे, प्रा. प्रशांत काळे, नागनाथ पांढरे, विठ्ठल कुन्हाळे, उद्धव सोमवंशी, सुलोचना रसाळ, पौर्णिमा लांडगे, सुनील बहिरे, दत्ता जावळे-पाटील, सचिन शिंदे, काकासाहेब आनंदगावकर, अंकुश शिंदे, श्रीकांत मोरे, विद्यासागर गिरी यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

