राज्य

ब्राम्हण समाजाला नष्ट करण्याची धमकी देणाऱ्या समाजकंठकावर कठोर कारवाई करावी

ब्राम्हण समाजाची पोलिसांकडे मागणी

  • लोहारा (जि. धाराशिव): अल्पसंख्याक असलेल्या ब्राम्हण समाजाविषय अपशब्द काढून वंश विच्छेद करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीविरूध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ब्राम्हण समाजांने लोहारा पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले की, योगेश सावंत या व्यक्तीने समाज माध्यमांसमोर राज्याचे गृहमंत्री देवंद्र फडवणीस यांच्यासह ब्राम्हण समाजाविरोधात आक्षेपार्ह विधान करून वंश विच्छेद करण्याची धमकी दिली आहे. या धमकीमुळे राज्यात केवळ दोन ते अडीच टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राम्हण समाजाच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. सदर व्यक्तीने पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र करून झुंडशाहीच्या माध्यमातून ब्राम्हण समाजाला संपविण्याचा माणस उघडपणे व्यक्त केलेला आहे. परिणामी समाज निर्वंश होऊन संपण्याची भिती निर्माण झाली आहे. सदरचे प्रक्षोभक वक्तव्य हे सुनियोजित व व्यापक कटाचा भाग असल्याचा आरोप करून या प्रकरणाची याची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्ती व त्याचा बोलविताधनी विरोधात कठोर कारवाई करावी, असे निवेदन लोहारा पोलिस प्रशासनाला दिले आहे. निवेदनावर यशवंत कुलकर्णी, मदन कुलकर्णी, गोपाळ संदीकर, मंगेश महाजन, जनक कुलकर्णी, प्रभात कुलकर्णी, गोविंद संदीकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close