डॉ. महेश मोटे साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

उमरगा (जि. धाराशिव) : तालुक्यातील मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे यांना साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बेलाटी, (ता. उत्तर सोलापूर) येथे आयोजित पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलनात रविवारी (ता. २५) इतिहास संशोधक तथा अध्यक्ष डॉ. श्रीमंत कोकाटे, संमेलनाध्यक्ष माजी आमदार अॅड. रामहरी रुपनवर यांच्या हस्ते डॉ. महेश मोटे, यांना साहित्यरत्न पुरस्कार देऊन गैरविण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी मीरा मोटे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. एस. चोपडे, सद्गुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवार पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीराम पाटील, संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले, लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संभाजीराव सुळ, लातूरचे उपायुक्त रामदास कोकरे, सोलापूर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, करमाळा मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रा. शिवाजी बंडगर, पत्रकार उज्वलकुमार माने, संयोजक सिद्धारूढ बेडगनूर, देवेंद्र मदने आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. डॉ. मोटे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे.





