कानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बीसीजी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील कानेगाव येथील प्राथमिक आरग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या लसीकरणामुळे नवीन क्षयरुग्ण कमी करण्यास मोठी मदत मिळणार आहे. कानेगाव प्राथमिक आरोग्य केद्रासह भातागळी, मार्डी, लोहारा (खुर्द), हिप्परगा (रवा) या उपकेंद्रात प्रौढ बीसीजी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. १८ वर्षावरील सर्व कुपोषित, मधुमेह, धूम्रपान करणारे तसेच ३ वर्षांपासून क्षय रोगाचाचा उपचार घेतलेलल्या व घेत असलेल्या रुग्णांना घरी जावून लसीकरण करण्यात येणार आहे. कानेगाव प्राथमिक केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावातील जास्तीत जास्त लोकानी लस घेऊन क्षयमुक्त भारत मोहीमेस सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज सोमवंशी यांंनी केले. यावेळी डॉ. प्रियंका बंदीछोडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.





