सामाजिक
बेरडवाडी जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

मुरूम (जि. धाराशिव): बेरडवाडी (ता. उमरगा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (ता. १९) उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतराव मंडले, मुख्याध्यापक अनिल मुडमे, सहशिक्षक सुनील राठोड, युवराज चव्हाण, बालाजी भालेराव आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी भाषणे केले. तसेच बालाजी भालेराव, अनिल मुडमे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन युवराज चव्हाण यांनी केले. आभार सुनील राठोड यांनी मानले.





