सामाजिक

जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत दोनशे विद्यार्थ्यांचा सहभाग

डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीचा उपक्रम

मुरूम (जि. धाराशिव): मुरूम (ता. उमरगा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने महामानव, बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक, व्याख्यान, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. रविवार (ता. २१) मुरूम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात उत्सव समितीच्या वतीने जिल्हा स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी प्राचार्या महानंदा रोडगे, उपमुख्यध्यापक उल्हास घुरघुरे, प्रा. के. के. ब्याळे, प्रा. सतीश रामपुरे, प्रा. सूर्यवंशी, विवेकानंद परसाळगे, प्रा. बबलू अंबर, पोलिस उपनिरीक्षक गाडेकर, उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्पर्धेसाठी जिल्ह्यातील दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उल्हास घुरघुरे यांनी मनोगत पर बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर प्रकाश टाकत स्पर्धकांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले. आभार प्रा. नागनाथ बनसोडे यांनी मानले. अजय गायकवाड,ज्ञानसगर भालेराव,अमर भालेराव,अजय सूर्यवंशी, विक्की बनसोडे आदींनी स्पर्धेसाठी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close