वयोश्री योजनेपासून ज्येष्ठ नागरिक वंचित

लोहारा (जि. धाराशिव): मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदतीचा लाभ देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन लोहारा शहरातील माजी नगरसेवक श्रीनिवास फुलसुंदर यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग धाराशिव यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, लोहारा शहरातील नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन दिलेल्या वेळेत अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह लोहारा येथे जमा केली आहेत. परंतु, अनेक ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा अद्याप लाभ मिळालेला नाही. वस्तीगृहातील सबंधीत विचारणा केली असता, त्यांच्याकडेही योग्य माहिती उपलब्ध नसल्याचे समजते. कांही नागरिकांना या योजनेचा लाभ मिळालेला असुन, शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक या लाभापासुन वंचित आहेत. तरी विनंती आहे कि, ज्या ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज प्रक्रियेत अडथळ्यामुळे प्रलंबित आहेत, त्याच्या सोबत संपर्क साधुन आवश्यक दुरुस्त्या करुण घ्याव्यात. तसेच पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी सबंधीत विभागाकडे सुपुत्र करुण अपात्र लाभार्थ्यांना योजणा राबविण्यासाठी पुढील कार्यवाही करावी. आपल्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा निवेदनात केली आहे.

