कौटुंबिक कारणामुळे संघमित्रा गायकवाड यांची निवडणुकीतून माघार

उमरगा (जि. धाराशिव): तालुक्यातील कसगी येथील रहिवाशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव संघमित्रा गायकवाड यांनी कौटुंबिक कारणास्तव उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघातील निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. बोलताना त्या म्हणाल्या की, मी निवडणुकीतून माघार घेतली असले तरी जनतेच्या सेवेत सदैव कार्यरत राहणार आहे. गेली दहा वर्षांपासून मी जनतेच्या अडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनात काठया लाठ्या खाऊन सर्व सामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. यापुढेही मी माझे कार्य आणखीन जोमात करणार आहे. माझ्या मुलाला हॉस्पिटल मध्ये अडमिट असलेल्या कारणांमुळे मी निवडणुकीतून माघार घेत आहे. उमरगा नगरपरिषद हद्दवाढ होऊन दहा वर्षे झाली तरी येथील रहिवाशांना पाणी विद्युत पुरवठा, रस्ते नाहीत, उमरगा शहरात कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. त्यांना सुविद्या उपलब्ध करून देण्यासाठी माझा संघर्ष कायम राहणार आहे.
सर्व सामान्य माणसाला व शेतकरी, कष्टकरी, कामगार, गरीब अश्या अठरापगड जातींचे लोकांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आपण घेतलेले लोककल्याण आणि समाज सेवेचे व्रत कायम सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

