
लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील सालेगाव येथे इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नव्याने बांधण्यात येत असलेल्या बाल रुग्णालयाचे भूमिपूजन उद्योजक, पार्वती मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. मागील काही वर्षांपासून इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्था ग्रामीण भागात कार्यरत आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य या कार्याबरोबरच शासनांच्या विविध कल्याणकारी योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम संस्थेकडून केले जात आहे. ग्रामीण भागाती लहान मुलांच्या आरोग्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सालेगाव येथे बाल रूग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून मोठ्या शस्त्रक्रिया व विविध आजारावरील उपचार देण्यात येणार आहे. या बाल रुग्णालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन पार्वती मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष मनोज देशपांडे, सचिव गोपाळ माने, सोसायटीचे चेरमन मुरलीधर पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष राजेंद्र बिराजदार, भिमसेन माने, महादेव गोरे, नितीन देशपांडे, अण्णाराव देशपांडे, संतोष भालेराव, लहू साळुंके, महेश साळुंके, बालाजी मातोळे, महेश देशपांडे, प्रताप कांबळे, मुबारक शेख, अब्बास शेख, बाबू शेख, हणमंत सगर, राजेंद्र मातोळे, यल्लाप्पा दंडगुले, श्रीकृष्ण चेंडके आदि उपस्थित होते.





