ईतर

साडेसहा कोटीच्या रस्ता दुरस्तीच्या कामास सुरवात: आमदार चौगुले यांनी केले भूमिपूजन

लोहारा (धराशिव): लोहारा ते मोघा-वडगाव मार्गे फणेपूरला जाणाऱ्या रस्त्याच्या दुरीस्तीसाठी सहा कोटी ५० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सोमवारी (ता. २३) करण्यात आले. लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर चौकातून मोघा-वडगाव मार्गे फणेपूरला जाणारा रस्ता २००७ मध्ये प्रधानमंत्री सडक योजनेतून करण्यात आला होता. अवघ्या काही वर्षातच रस्त्याची मोठी दूरवस्था झाली. ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले होते. आमदार चौगुले यांनी या रस्ता कामाच्या दुरूस्तीसाठी तब्बल सहा कोटी ५० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदार चौगुले यांनी रस्ता दुरूस्तीच्या कामाचे भूमिपूजन केले. सहा कोटी ५० लाखाच्या निधीतून १९ किलोमीटर रस्ता करण्यात येणार असून तीन टप्प्यात काम केले जाणार आहे. यावेळी यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता एस. एस. घोडके, शाखा अभियंता राजेंद्र माळी, शाखा अभियंता अरुण रोडगे, नगरसेवक अविनाश माळी, बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, सरपंच बबन फुलसुंदर, युवा सेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, मारूती लोहार, बालाजी बंडगर, अरूण जगताप, प्रमोद बंगले, दीपक रोडगे, सरपंच सचिन रसाळ, विनोद मुसांडे, ओम कोरे, भागवत दणाणे, गोवर्धन मुसांडे, सुरेश दंडगुले, प्राचार्य शहाजी जाधव, नारायण क्षीरसागर, धैर्यशील सुर्यवंशी, नयुम सवार, गौतम बेलकुंदे, अविनाश राठोड, अशोक निवृत्ती जाधव, आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close