क्राइम

चार हजारांची लाच घेणाऱ्या लेखा सहायकासह सेवानिवृत्त अभियंत्यास अटक

धाराशिव: जिल्हा परिषद शाळेमधील सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्याची अंशराशीकरण व उपदानाची रक्कम काढून देण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारताना धाराशिव पंचायत समितीच्या वरिष्ठ लेखा सहायकासह एका सेवानिवृत्त अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील एका ३० वर्षीय तक्रारदार यांची आई जिल्हा परिषद शाळेतून शिपाई पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अंशराशीकरण  व उपदानाची एकूण १५ लाख २९ हजार ४०८ रुपये रक्कम तक्रारदार यांच्या आईच्या खात्यावर जमा करून देण्यासाठी धाराशिव पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक लेखा मिलिंद सूर्यकांत कांबळे (वय- ४५, वर्ग -३), सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हनुमंत गोपाळ पवार (वय- ६९ रा. काकडे प्लॉट धाराशिव)  यांनी दि. २६ सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष ४ हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम दि.२८ सप्टेंबर रोजी आरोपी कांबळे यांनी लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. याप्रकरणी आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्ष सिध्दाराम म्हेत्रे यांनी सापळा रचून ही कारवाई केली. सापळा पथकामध्ये पोलिस अंमलदार  दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, सचिन शेवाळे, सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, नागेश शेरकर यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close