राजकिय

नागराळ येथे भाजपच्या गाव चलो अभियानास प्रतिसाद

लोहारा (जि. धाराशिव): लोहारा तालुक्यातील नागराळ येथे शुक्रवारी भाजपच्या वतीने गाव चलो अभियान राबविण्यात आले. सायंकाळी गाव चलो अभियानाचे जिल्हा संयोजक तथा भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. मिलिंद पाटील, सहसंयोजक दत्ता राजमाने, सहसंयोजक, प्रवाशी कार्यकर्ते रामदास कोळगे, तालुका अध्यक्ष शिवशंकर हत्तरगे यांनी भेट घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या अभियानास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती सांगितली. केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस लाभार्थी, पीएम किसान योजना लाभार्थ्यी, अशा विविध लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणुन निरसन करण्यात आले. यावेळी महिला मोर्चा आघाडी तालुकाध्यक्षा संजीवनी बुरले, तालुका सरचिटणीस दगडू तिगाडे, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, गाव चलो अभियान तालुका संयोजक प्रमोद पोतदार, ग्राम संयोजक अॅड. रविकांत भोंडवे, तालुका चिटणीस युवराज जाधव, युवा मोर्चा शहराध्यक्ष अध्यक्ष बाबा सुंबेकर, निकेश बचाटे, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ फावडे, बूथ प्रमुख बाबुराव घाडगे, किरण चिंचोळे, सत्यनारायण रावसाहेब गोरे, गुंडू जाधव, राम भोंडवे, रत्नाजी गोरे, देवाप्पा भोकरे, किसन पाटील, प्रभाकर कोळी, छोटू गोरे, अतुल गोरे, वली पठाण, माजी सैनिक अभिमान बापूराव गोरे, उपसरपंच गुंडू जाधव, भरत रोडगे, यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close