राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांचा वाढदिवस साजरा

उमरगा (जि. धाराशिव): जिल्हा परिषदचे माजी समाज कल्याण सभापती, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांचा वाढदिवस सोमवारी (दि. ९) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिग्विजय शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिंदे यांनी अल्पावधित राजकारणात चांगलाच जम बसविला आहे. पहिल्यांदाच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याच्या बळावर समाज कल्याण सभापतीपद मिळविले. या काळात त्यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून नागरिकांशी नाळ जोडली. मित भाषी असल्याने त्यांची सर्वांशी मैत्री आहे. सोमवारी उमरगा येथील कैलास शिंदे मंगल कार्यालयात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शुभेच्छा देण्यासाठी राजकारणी, उद्योजक, व्यापारी, पत्रकार, सामाजिक संघटनांचे पदाधिकार यांच्यासह सर्वच स्तरातील नागरिक उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त दिग्विजय शिंदे यांच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी भाजपचे माजी लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इक्बाल मुल्ला, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, मोहन जेवळीकर, व्यंकट चव्हाण, श्रीमंत मदने यांनी सत्कार केला.

