शैक्षणिक
लोहारा शहरातील हेमंत जेवळीकर यांचा मुलगा सक्षम जेवळीकर याची उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी

- लोहारा (जि. धाराशिव): लोहारा शहरातील रहिवासी हेमंत जेवळीकर यांचा मुलगा सक्षम हेमंत जेवळीकर याने CBSE बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत ९२.६०% गुणांसह घवघवीत यश संपादन केले आहे.
सक्षम सोलापूर येथील इंडियन मॉडेल स्कूल या नामांकित शाळेत शिक्षण घेत होता. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास आणि पालक व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे त्याने हे यश मिळवले. त्याच्या या उत्तुंग यशामुळे जेवळीकर कुटुंबीयांसह लोहारा शहरात आनंदाचे वातावरण आहे.
सक्षमचे पुढील शिक्षणही अशाच उत्कृष्ट पद्धतीने पार पडावे व तो उज्ज्वल भविष्यासाठी नवी शिखरे गाठो, अशा शुभेच्छा लोहारा व परिसरातील नागरिकांनी दिल्या आहेत.




