ईतर

लघु उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देऊन भांडवल उपलब्ध करून देणार : ॲड. आकांक्षा चौगुले

लोहारा (जि. धाराशिव): लोहारा-उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रशिक्षण देऊन भांडवल उपलब्ध करुन देऊन आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन ॲड.आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी केले. ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सर्व साधारणसभा शहरातील गोरे कॉम्प्लेक्स येथे दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी उत्साहात पार पडली त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी प्रमुख म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, नगराध्यक्षा तथा संचालिका सौ.वैशालीताई खराडे, पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ‌.सारीका प्रमोद बंगले, सचिव सौ.मिरा अविनाश माळी, अरुण जगताप, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, संचालिका सौ.सुनिता अरुण जगताप, सौ. मुक्ताबाई राजेंद्र भोजने, सौ. मनिषा विजयकुमार शिंदे, सौ.सुलोचना विजयकुमार वडदरे, श्रद्धानंद माने पाटील, तज्ञ संचालिका सौ.मुमताज अमिन सुंबेकर, नगरसेविका शामलताई माळी, दिपक रोडगे, संध्याताई शिंदे, आदि उपस्थित होते. यावेळी चेअरमन ॲड.आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पतसंस्थेच्या वतीने शहरातील स्वच्छता विभागाच्या कर्मचारी महिला शालुबाई रोडगे, निलावती रोडगे, जिजाबाई सगट, सुनिता कांबळे, जनाबाई शेवाळे, कांचन सितापुरे, मिनाबाई कोकणे, रेश्मा शिंदे, कोमल कांबळे, राजश्री लवटे व 11 महिन्यात कर्ज परतफेड करणाऱ्या महिला बचत गटाच्या मलेका मौला शेख, कमल खराडे, उषा कोळी, शमीम जब्बार मुल्ला, अरुणा फुलकुरते यांचा यथोचित सत्कार करुन सन्मान करण्यात आला. व पीगमी एजंट व पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विजयकुमार कुमार निकम, मॅनेजर भागवत पवार, कर्मचारी भागवत पवार, बालाजी जगदाळे, सौ.राजश्री घंटे, सौ वैशाली चव्हाण, तसेच सौ संध्याताई शिंदे, राजश्री कोळी, अनिकेत कदम, जितेंद्र कदम, शहाजी कोकाटे,श्रीकांत बिराजदार, किरण पाटील, राजेंद्र माळी, वैभव सोलंकर, अरुण सुर्यवंशी, विष्णु जाधव, आदित चव्हाण, रोहन खराडे, यांच्यासह शहरातील व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिमान खराडे व सुत्रसंचलन संदिप जगताप यांनी केले तर आभार आभार अरुण जगताप मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close