ईतर

मराठा आरक्षणासाठी महिलांचा एल्गार: होळी येथे साखळी उपोषण सुरू

लोहारा (जि. धाराशिव): तालुक्यातील ग्रामीण भागातही मराठा योद्धा मनोज जंरागे पाटील यांनी आरक्षणासाठी सुरू केलेल्या प्राणांतिक आमरण उपोषणाला पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. तालुक्यातील होळी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला प्रारंभ केला आहे. यात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन लक्षवेधून घेतले आहे. जो पर्यंत मराठा समाजाला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकणारं आरक्षण लागू करण्यात येत नाही, तो पर्यंत हे साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या काळात आजी, माजी आमदार, खासदारांसह सर्वपक्षीय राजकीय पक्षाच्या नेत्यांना गाव प्रवेश बंदी केली असून आगामी होणाऱ्या निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज शुक्रवारपासून (दि. २७) साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. आजचे उपोषणार्थी म्हणून महिलांनी पुढाकार घेतला यावेळी सरोजा बिराजदार, सुनंदा मोरे, देवयानी गायकवाड, आयोद्ध्या बाबळसुरे, आशा जाधव, शशिकला गायकवाड, सुनंदा जाधव, रेखा बाबळसुरे, कमलाबाई जाधव यांच्यासह गावातील प्रा. गोविंद जाधव, प्रदीप मोरे, करण बाबळसुरे, संजय मनाळे, अजित जाधव, केशव सरवदे, सतीश माळी शंकर मोरे युवराज कोकाटे, ओम बिराजदार अभिषेक जाधव, विठ्ठल गायकवाड, विशाल जाधव यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close