राष्ट्रीय समाज पक्षाकडून प्रभाकर कवाळे निवडणुकीच्या रिंगणात

लोहारा (जि. धाराशिव): उमरगा-लोहारा विधानसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने प्रभाकर कवाळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कवाळे यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) सातत्याने प्रबळ पक्षाबरोबर युती करून निवडणुका लढविल्या आहेत. भाजपबरोबर त्यांचा घरोबा राहिला आहे. मात्र, विधानसभेत पक्षाला समाधानकारक जागा न दिल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विधानसभेच्या २८८ पैकी ५४ जागेवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. यात उमरगा-लोहारा विधानसभेची उमेदवारी प्रभाकर कवाळे यांना जाहीर केली आहे. प्रभाकर कवाळे हे लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील रहिवाशी आहेत. गेली ३५ वर्षांपासून राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी उमरगा-लोहारा तालुक्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. प्रभाकर कवाळे यांच्या रूपाने लोहारा तालुक्याला पहिल्यांदा विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

