लिंगायत समाजाच्या आहोटीला राजकीय नेते व धर्मगुरू जबाबदार: प्रा.सुदर्शनराव बिरादार

मुरूम (जि. धाराशिव): लिंगायत महासंघाच्या जळकोट तालुक्याच्या वतीने अतनुर येथे लिंगायत समाज बांधवांची एक महत्त्वाची बैठक दिनांक1 जानेवारी 2025 रोजी दुपारी एक वाजता लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला मार्गदर्शन करताना लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार सर म्हणाले की, एकेकाळी खुप वैभवशाली व नावारूपात असलेला वीरशैव लिंगायत समाज आज अडचणीत आला आहे. आज लिंगायत समाजाची सर्व स्तरांवर पिछेहाट होत आहे. शिक्षणात, नौकरीत, व्यापारात , सामाजिक, राजकीय आणि आर्थिक, धार्मिक सर्वच ठिकाणी आमचा आलेख हा खाली जात आहे. या पिछेहाटीला जबाबदार लिंगायत समाजातील राजकिय पुढारी व काही धर्मगुरू जबाबदार आहेत. नेत्यांना पदे मिळवून सत्ता , संपत्ती मिळवायची आहे. जन्मभर सत्तेचे पदे स्वतः घ्या घरात ठेवायची आहेत. त्यासाठी समाजाचा फक्त वापर करतात वापर झाल्यानंतर समाजाला ढुंकुनही विचारत नाहीत. धर्मगुरुनांही पोथी पुराणाशिवाय काही देणे घेणे नाही आणि या मंडळींवर विश्वास ठेवुनी समाज जगतोय ही खुप मोठी शोकांतिका आहे. यांच्या भरवशावर राहिल्याने समाजाला ओहोटी लागलीआहे. बंधुंनो इथून पुढे येणारा काळ व वेळ खुप वाईट आहे. आताच सावध व्हा,आपला विकास आपण करण्यासाठी तयार व्हा. संघटीत व्हा एक व्हा, एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हा, तुम्हाला कोणीही आडवे येणार नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण आली तिथे संघटना तुमच्यासोबत आहे. असे मत बिरादार सरांनी मांडले. या वेळी त्यांनी लिंगायत महासंघाच्या अतनुर शाखेची स्थापना केली व सुधाकर मुगदाळे यांची अध्यक्षपदी निवड करुन त्यांच्या पंधरा लोकांच्या कार्यकारिणीला मान्यता दिली. या कार्यक्रमाला लिंगायत महासंघाचे उदगीर शहराध्यक्ष भीमाशंकर शेळके,तसेच जळकोट तालुकाध्यक्ष शंकरराव धूळशेट्टे,तालुकासहसचिव बालाजी शिवशेट्टे ,हणमंत भरडे, तालुका उपाध्यक्ष विजयकुमार कापसे, उदगीरचे बापुराव शेटकार, नळगीरचे माधवराव निंगदाळे गुरुजी ,जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव गंगाधर सिद्धेश्वरे, प्राचार्य दत्तात्रय हाम्पल्ले, किशन मुंगदळे, बसवेश्वर सोप्पा, प्रदीप काळे,यांच्यासह अनेक मान्यवरांसह सुधाकर मुंगदळे, बाळू सासट्टे, शिवराज रेड्डी, रवी कुमार कल्पे, महावीर बिचकुंदे, दत्तात्रेय गळगे ,विश्वनाथ हिंगणे, पांडुरंग कापसे, बाबुराव पंचगल्ले गुरुजी, मनोहर मुगदळे, किशन मुगदळे, विजयकुमार कापसे, उमाकांत बिचकुंदे, बाबुराव कापसे,माधव रेड्डी, आदी नुतन पदाधिकारी उपस्थित होते.. या बैठकीसाठी जळकोट तालुक्यातील तसेच आतनूर गावातील व आजुबाजूच्या गावातील लिंगायत समाज बांधवांनी,महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

