क्राइम

पाच लाख ३६ हजाराचा गुटखा जप्त: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई; तिघांविरोधात गुन्हा दाखल

धाराशिव: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंबेजवळगा येथी माळवस्तीमध्ये छापा मारून राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला पाच लाख ३६ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तिघाजणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यशवंत जाधव यांना अंबेजवळगा येथील माळवस्तीमध्ये तीन इसम महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ सुगंधीत सुपारी व गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध्य विक्री करत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवच्या पथकाने माळवस्तीमध्ये जाऊन कारवाई केली. यावेळी आरोपी आबासाहेब बाबुशा नन्वरे, विशाल हनुमंत पवार, किरण उर्फ कृष्णा जाधव (रा.अंबेजवळगा, ता. जि. धाराशिव) हे तिघे पोलिसांची चाहुल लागताच पळून गेले. त्यानंतर पोलिस पथकाने आबासाहेब नन्वरे यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये जावून पाहणी केली. त्यामध्ये एकुण पोते क्र. एक ते ३१ मध्ये हिरा पान मसालाचे पाऊच मिळून आले. प्रत्येक पोत्यामध्ये शंभर पाऊच, असे एकूण तीन हजार १०० पाऊच, पोते क्र ३२ ते ३७ मध्ये पाहणी करता आतमध्ये गुटख्याचे ४२० पाऊचसह एक होन्डां शाईन मोटरसायकल असा एकूण पाच लाख ३६ हजार रूपये किंमतीचा सुगंधीत पान मसाला, गुटखा साठवण करुन सदरचा गुटखा विक्री करण्यासाठी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला मिळून आला. त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेतला. गुटखा विक्री करणारे आबासाहेब ननवरे, विशाल हनुमंत पवार, किरण उर्फ कृष्णा जाधव यांच्या विरुध्द धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी यशवंत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर, पोलीस हावलदार हुसेन सय्यद , अमोल चव्हाण, बबन जाधवर, बलदेव ठाकुर, चालक पोलीस हावलदार, मस्के यांच्या पथकाने कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close