ईतर

लोहाऱ्यात सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ

लोहारा (जि. धाराशिव): शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील नगरसेवक अमीन सुंबेकर यांच्या प्रयत्नातून शासकीय गोदाम ते मेन रोडपर्यंत सिमेंट रस्ता मंजूर झाला आहे. या सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन सोमवारी (दि. ४) नगराध्यक्ष वैशाली खराडे, नगरसेविका सारिका बंगले यांच्या हस्ते झाले. पोलिस ठाणे मेन रोडजवळ शासकीय गोदाम आहे. शासनाकडून वितरीत करण्यात येणाऱ्या रेशनच्या धान्याची याठिकाणी साठवणूक करून तालुक्याती स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरीत करण्यात येते. गोदामाकडे जाणारा रस्ता कच्चा आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो. त्यामुळे वाहनांना धान्याची ये-जा करताना अडथळा निर्माण होतो. ही अडचण ओळखून विद्यमान नगरसेवक अमीन सुंबेकर यांनी पोलिस ठाणे मेन रोड ते शासकीय गोदाम या सिमेंट रस्त्यासाठी १५ लाख रूपये मंजूर करून घेतले. निधी उपलब्ध झाल्याने सोमवारी सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच शंकर जट्टे, माजी नगरसेवक आयुब शेख, अभिमान खराडे, युवसेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, नगरसेवक विजयकुमार ढगे, के. डी. पाटील, लक्ष्मण रसाळ, भगवान मक्तेदार, अणिल स्वामी, जनक कुलर्णी, माणिक तिगाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close