राज्य

काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

लोहारा (जि. धाराशिव): काँग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती शहरात बुधवारी (ता. दोन) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीतल घटकपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुल्ला कॉमप्लेक्समध्ये जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे होते. यावेळी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव, कृषी अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबासाहेब जाधव, कृषी अधिकारी दत्तात्रय पाटील, अॅड. सयाजी शिंदे, श्यामसुंदर तोरकडे यांनी मनोगतातून राष्ट्रपुरूषांच्या कार्याचा आढावा घेत आज देशाला त्यांच्या विचाराची गरज असल्याचे अधोरेखित केले. सूत्रसंचालन व आभार दत्तात्रय गाडेकर यांनी मानले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत साखरे, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, राष्ट्रवादीचे शब्बीर गवंडी, काँग्रसचे तालुका सरचिटणीस इस्माईल मुल्ला, बसवराज पाटील, अल्पसंख्यांक सेलचे रौफ बागवान, शिवसेनेचे शिवदूत महेबूब गवंडी, राजेंद्र जाधव, लक्ष्मण रसाळ, प्रकाश लोभे, शैलेश जट्टे, शरणप्पा शेगजी, मल्लिनाथ बनशेट्टी, नजीर सिद्दकी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close