ईतर

राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुस्काराने नेताजी सांगवे सन्मानित

लोहारा: (जि. धाराशिव): तालुक्यातील करजगावचे ग्रामपंचायत अधिकारी नेताजी सांगवे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नेताजी सांगवे हे लोहारा तालुक्यातील करजगाव येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी गावात विविध उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमठवला आहे. यात ‘माझा गाव सुंदर गाव’ योजनेअंतर्गत तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. विशेष काळजीमुळे मोहीम यशस्वी केली. बालविवाह प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवली. गावात प्रभावी दारू बंदी योजना अंमलात आणली. लोकन्यायालयात यशस्वी कामगिरी केली. या सर्व उल्लेखनीय कार्यामुळे नेताजी संगवे, पत्नी शुभांगी सांगवे यांचा सपत्नीक सत्कार करून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close