राजकिय
जनस्वराज्य यात्रेचे लोहारा शहरात स्वागत: नोटांचा हार घालून महादेव जानकारांचा सत्कार

- लोहारा (जि. धाराशिव): राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या जनस्वराज्य यात्रेचे लोहारा शहरात बुधवारी ४ ऑक्टोंबर रोजी जल्लोषात स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर जनस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेच्यामाध्यमातून लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून पक्षाची ध्येयधोरणे सांगण्यात येत आहेत. या यात्रेचे बुधवारी सायंकाळी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होताच कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचा पैशांच्या नोटांचा हार घालून सत्कार केला. यावेळी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सचिन जगताप, पंडित बारगळ, उमेश देवकर-पाटील, रघुवीर घोडके, माजी नगराध्यक्ष प्रताप घोडके, मार्डीचे माजी सरपंच श्रीमंत पाटील, महेश वाघे, बालाजी सोनटक्के, तंटा मुक्ती अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, सुरेश जगताप, प्रवीण जगताप, सागर जगताप, गिरीश वाले, सूर्यकांत माने, प्रेम लांडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.

