लोहारा शहर कडकडीत बंद; लाठीहल्ला प्रकरण

लोहारा (जि. धाराशिव): मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता.दोन) लोहारा शहर कडडीत बंद पाळण्यात आला. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सारटी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी बसलेले अजय जरडे पाटील यांना आंदोलन करण्यापासून रोखण्यासाठी राज्य शासनाने पोलिस बळाचा वापर करून लाठीमार केला. यात महिला, बालकेदेखील जखमी झाले. या घटनेचा निषेध करण्यासाठी लोहारा शहरातील विविध संघटना व सकल मराठा समाजाकडून लोहारा बंदची हाक दिली होती. याला व्यापारी वर्गांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शनिवारी दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. शहरातील शाळा महाविद्यालयेही या बंदमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. या बंदचा परिणाम वाहतुकीवरही झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या बससे आज दिवसभर बंद होत्या. तालुक्यात आज एकही बस रस्त्यावरून धावली नाही. खासगी वाहतूक महणावी तसी सुरू नसल्याने वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला. मराठा आरक्षण तत्काळ लागू करण्यात यावे, अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून केली. यावेळी नगरसेवक प्रशांत काळे, युवा सेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, अभिमान खराडे, हणमंत गररड, महेश गोरे, स्वराज्य संटनेचे प्रशांत थोरात, जिजाऊ ब्रिगेडच्या रंजना हासुरे, छावा संघटनेचे चंद्रशेखर जावळे, बाळासाहेब पाटील, दीपक रोडगे, विजय ढगे, सुखदेव सातपुते, प्रकाश भगत, दत्तात्रय मुळे, हनुमंत गरड, संजय मुरटे, आकाश येरनुळे, बालाजी मुळे, सचिन भरारे, महेश सुतार, परमेश्वर जाधव, सतीश जाधव, योगेश गरड, बाळु कांबळे, मंगेश गोरे, जीवन गोरे, आविनाश गोरे, सागर पाटील, किरण मोरे, शुभम रसाळ, रोहन खराडे, अमोल जाधव, दत्ता घाडगे, नितीन गोरे, आदी उपस्थित होते.

