राज्य

गजापूर घटनेच्या निषेधार्थ लोहारा शहर कडकडीत बंद; निषेध फेरी काढून तहसीलदरांना दिले निवेदन

लोहारा(जि. धाराशिव): कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथील घटनेच्या निषेधार्थ सकल मुस्लीम समाजाच्या वतीने सोमवारी (ता. २२) पुकारण्यात आलेल्या लोहारा शहर बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मुस्लीम बंधवांनी काळ्या फिती लावून शहरातून निषेध फेरी काढली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यावरून वाद झाला. त्यामुळे गजापूर येथील काही समाजकंटकांनी प्रार्थनास्थळाची तोडफोड करीत जाळपोळ केली. तेथील निष्पाप लोकांवर भ्याड हल्ला करुन महिला, लहान मुले, वृद्ध लोकांना अमानुषपणे मारहाण केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ लोहारा शहरात कडकडीत बंद पळण्यात आला. सकल मुस्लीम बांधवांनी आदल्या दिवशीच लोहारा बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने उघडलीच नाहीत. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. दरम्यान, सकाळी सव्वा अकराच्या सुमारस छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मुस्लीम जमाज बांधव एकत्रित येत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, आझाद चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत दंडाला काळ्या फिती लावून निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी घटनेस जबाबदार असणाऱ्या जातीयवादी संघटना व गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करून राज्यातील जातीय सलोखा कायम टिकविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निवेदन तहसीलदार काशीनाथ पाटील यांना देण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख, शब्बीर गवंडी, नगरसेवक अमीन सुंबेकर, शिवसेना तालुकाप्रमुख सलीम शेख, महेबूब गवंडी, आयुब शेख-टेलर, आरिफ खानापुरे, बाबा शेख, गौस मोमीन, इक्बाल मुल्ला, आय्याज सवार, आब्बास शेख, दादा मुल्ला, नयुम सवार, शेरु मासुलदार, नजीर सिद्दक्की, झहीर खुटेपड, खुनमीर मोमीन, निहाल मुजावर, शाहरुख गवंडी, आरबज फकीर, वसीम हेड्डे, फयाज नदाफ, अल्ताफ शेख, मोईज शेख, नोमान पठाण, आरबाज कमाल, साहिल शेख,सिराज सिद्दीकी, अन्वर कुरेशी, जमीर सवार, समद सुंबेकर, अल्ताफ सुंबेकर, मैनु बागवान, कैफ कुरेशी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close