कलश रथयात्रेचे लोहारा शहरात उत्साहात स्वागत

लोहारा (जि. धाराशिव): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्ष पूर्ण होत असल्याने हिंदू साम्राज्य स्थापना दिन साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या वतीने धाराशिव जिल्हाभरात कलश व रथ यात्रा काढण्यात आली आहे. दिनांक एक आक्टोबर रोजी उमरगा तालुक्यातील अचलबेट देवस्थान या ठिकाणाहून कलश व रथयात्रेस सुरूवात करण्यात आली. उमरगा तालुक्यातून या रथ यात्रेचे मंगळवारी ३ ऑक्टोंबर रोजी लोहारा शहरातील भारतमाता मंदिरात आगमन झाले. या रथ रथयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कलशाचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर रथयात्रेचे उद्देश सांगताना चंदनशिवे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्ष पूर्ण होत असून १६ व्या शतकातील राज्याभिषेक झालेले एकमेव हिंदू राजे होते. हिंदुसाठी गौरवास्पद इतिहास आहे. हा इतिहास पुढच्या पिढीला माहित होण्यासाठी रथयातत्रेचे अयोजन करण्यात आलेल आहे. याप्रसंगी धाराशिव जिल्हा धर्मप्रसार प्रमुख मुरलीधर कुलकर्णी, बबनगिरी महाराज उंडरगावकर, दत्तमामा सलगरे, दिनकर जावळे-पाटील, शंकर जाधव, शहाजी जाधव, यशवंत चंदनशिवे, विक्रांत संगशेट्टी, दगडू तिगाडे, प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, बालाजी चव्हाण, अशोक तिगाडे, यशवंत चंदनशिवे, मनोज तिगाडे, विरेष स्वामी, युवराज जाधव, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





