ईतर

पत्रकार बालाजी बिराजदार यांना शोधवार्ता पुरस्कार प्रदान

लोहारा (जि. धाराशि व): उदगीर (जि. लातूर ) येथील तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा शोधवार्ता पुरस्कार शहरातील दै. लोकमतचे पत्रकार बालाजी बिराजदार यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

उदगीर येथील तालुका पत्रकार संघाकडून मराठवाडास्तरीय शोधवार्ता व विकासवार्ता गटात स्पर्धा घेतली जाते. शहरातील लोकमतचे पत्रकार बालाजी बिराजदार यांच्या ‘आयुष्याचा धागा विणता विणेना, सुई मिळेना जीवनाची!’ या बातमीला शोधवार्ता पुरस्कार मिळाला. शनिवारी उदगीर येथील उदगिरी लेन्स नेत्र रूग्णालय सभागृहात पुरस्काराचे वितरण सोहळा संपन्न झा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शिवाजीराव काळगे उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राम मोतीपवळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी खासदार काळगे, आमदार बनसोडे यांच्या हस्ते बालाजी बिराजदार यांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष आयुब शेख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख (ठाकरे) अमोल बिराजदार, प्राचार्य शहाजी जाधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close