सामाजिक

जेवळीकरांनी नेहमी प्रमाणे दाखविले माणुसकीचे दर्शन

गरीब रूग्णाला केली वैद्यकीय आर्थिक मदत

लोहारा (जि. धाराशिव): लोहारा तालुक्यातील जेवळी येथील सामान्य कुटुंबातील चाकरमानी राजेंद्र सिद्राम कारभारी हे गेल्या काही दिवसांपासून शारीरिक तक्रारीच्या अडचणी सातत्याने जाणवत होत्या. खालावलेली आर्थिक परिस्थितीमुळे जुजबी औषध गोळ्या करूनही कोणताच फरक पडला नाही. दिवसेंदिवस शारीरिक त्रास वाढतच राहीला. वैद्यकीय निदानाअंती शरिरातील वाॅलला छिद्र असल्याचे निष्पण्ण झाले. याचा कुटुंबियांना धक्काच बसला. घरातील कर्तापुरूष आजारी पडल्याने कुटुंब अस्वस्थ झाले. याची माहिती गावचे सरपंच तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांनी सदर कुटुंबीयांची भेट घेवून परिस्थितीची गांभिर्याने दखल घेत “अट्टल जेवळीकर रहिवासी संघ पुणे” या वाट्स ॲपचे ग्रुप ॲडमीन अभियंता व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्या व्यक्तीला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला.

आजारग्रस्त राजेंद्र कारभारी यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी अभियंता प्रसाद पाटील यांनी अट्टल जेवळीकर रहिवासी संघ पुणे, जेवळी शिवार, माझं गाव – जेवळी तसेच तत्सम विविध वाट्स ॲप ग्रुप वरती पोस्ट पाठवून मदतीचे आवाहन कले. संबंधित पोस्ट पाहतच बहुतांश नोकरदार, व्यावसायिक, गावकरी, हितचिंतक व विविध राजकीय, सामाजिक व्यक्तींनी आप आपल्या परीने आर्थिक मदत आजरग्रस्त रूग्ण राजेंद्र कारभारी यांच्या फोन पे व गुगल पे खात्यावरती जमा ही केली. जमा केलेल्या रकमेचा फोटो ग्रुप वरती पाठवून इतरांनाही मदतीसाठी प्रेरीत करून मदतीचा ओघ दिवसभर चालू ठेवला. कामधंद्याच्या निमित्ताने गाव सोडून शेकडो मैल दूर राहूनही गाव, गावकरी व माणुसकी सदैव तेवत ठेवलेले व्यक्ती व व्यक्तिमत्वाचे दर्शन पुन्हा एकदा या प्रसंगाच्या निमित्ताने अनुभवता आल्याची भावनिक प्रतिक्रिया अभियंता प्रसाद पाटील, सरपंच मोहन पणुरे यांनी बोलून दाखविली. सदर केलेली आर्थिक मदत, दाखवलेली माणुसकी व गावकऱ्याच्या बिकट प्रसंगानुरूप जीवंत ठेवलेली आपलेपणाची भावना याबद्दल आर्थिक सहकार्य केलेल्या प्रत्येक मदतनीस दात्याचे आभार व्यक्त करण्यात आले.

संबंधित मदतीसाठी कोणत्याही व्यक्तीला व्यक्तिशःहा फोन न करता फक्त मदतीच्या आवाहन रूपी मेसेज द्वारे मिळालेली आर्थिक मदत पाहता संबंधीत गरजू कुटुंबीयही भारावून गेले. केलेल्या आर्थिक व भावनिक सहकार्याबद्दल आभार व्यक्त करून लवकरच संबंधित रूग्ण व्यक्ती ठणठणीत बरा होऊन लवकरच गावी पोहोचेल असा ठाम विश्वासही व्यक्त केला. आर्थिक सहकार्या सोबतच मानसिक पाठबळ दिल्याबद्दल , गावकरी या भावनेतून तात्काळ मदत करून आपलेपणाची गावकरी रूपी माणुसकी जीवंत ठेवून आजही माणुसकी जीवंत ठेवल्याबद्दल सदर उपक्रमाची सकारात्मक चर्चा गाव पातळी व परिसरात दिवसभर होऊन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गावकऱ्याच्या संकट कालीन मदतीसाठी साता समुद्रा पलीकडून माणुसकीचे दर्शन

मुळचे जेवळी गावचे माजी निवृत्त उच्च पदस्थ व वरिष्ठ अधिकारी हे सध्या टोरॅन्टो – कॅनडा येथे वास्तव्यास आहेत. सदर मदतीचा मेसेज पाहताच साता समुद्रापार असूनही , मदतीसाठी गावातील प्रतिष्ठित डॉक्टर यांच्याशी संपर्क साधून तात्काळ ५०००/- रूपये आर्थिक सहकार्य केले. विविध पदे भुषवून, देश विदेशा मध्ये वास्तव करूनही गाव व गावकरी यांच्याशी नाळ आजही जोडलेली आहेच. माणुसकीचे या पेक्षा उत्तम उदाहरण आणखीन दुसरे कोणते असू शकते..! हे पाहण्याचे भाग्य या कार्याच्या निमित्ताने लाभले हीच खरी कार्याची पोच पावती.

  • इंजिनिअर प्रसाद पाटील पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close