ईतर

मार्डी येथील जिंदावली ऊरसास उत्साहात प्रारंभ

लोहारा (जि. धाराशिव): हिंदु-मुस्लिम समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्यातील मार्डी येथील जिंदावली ऊरूसास सुरवात झाली असून परंपरेनुसार गुरूवारी (ता. १५) सायंकाळी सहावाजता नायब तहसीलदार महादेव जाधव यांच्या डोक्यावर मानाचा संदल देऊन लोहारा शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यातील मार्डी येथे सुफी संत हजरत ख्वाजा जैनोद्दीन चिस्ती उर्फ जिंदावली यांचा दर्गा आहे. हिंदु-मुस्लिमांचे ते श्रध्दास्थान असून येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊरूस भरतो. या ऊरूसास कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. १५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ऊरूस कमेटीकडून करण्यात आले आहे. तहसीलदार यांच्या डोक्यावर मानाचा संदल देण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार गुरूवारी (ता.१५) सायंकाळी सात वाजता लोहारा तहसील कार्यालय येथून नायब तहसीलदार महादेव जाधव यांच्या डोक्यावर मानाचा संदल देऊन शहरातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर रात्री एका वाहानातून संदल मार्डी येथील जिंदावली दर्ग्याकडे रवाना झाला. सर्व मानकरी, मान्यवर, ग्रामस्थ, मुजावर यांच्या उपस्थितीत जिंदावली यांच्या समाधीवर संदल व चादर, फुले वाहून फातिहा पठण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते नागण्णा वकील, चंद्रकांत पाटील, पोलिस निरीक्षक अजित चिंतले, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, सलीम शेख, महेबूब गवंडी, अजीम हेड्डे, वजीर शेख, रोजगार हमी योजनेचे माजी चेअरमन आयुब शेख, नगरसेवक जालिंदर कोकणे, माजी नगरसेवक श्रीनिवास फुलसुंदर, रौफ  बागवान, नगरसेवक अमीन सुंबेकर, विजयकुमार ढगे, दीपक मुळे, शब्बीर गवंडी, श्रीकांत भरारे, अभिमान खराडे, विठ्ठल वचणे, के. डी. पाटील, रफिक शेख, चाँद हेड्डे, नजीर सिद्दकी, जब्बार मुल्ला, शफिक सिद्दकी, अलीम सिद्दकी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
            ……धार्मिक कार्यक्रम….
जिंदावली यांच्या ऊरसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. १६) सकाळी विधिवत पूजा केली जाईल, सायंकाळी मानकरी यांच्या उपस्थितीत दर्गाहवर दिवे लावले जाती. त्यानंतर रात्री कव्वालीचा जंगी मुकाबला होणार आहे. शनिववारी (ता. १७) सकाळी दहा वाजता जियारतचा कार्यक्रम संपन्न होणार असून त्यामध्ये कुराण पठण व फातेहाख्वानी होणार आहे. दुपारी महाप्रसादचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर ऊरसाची सागता होणार आहे.
…………

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close