राजकिय

धाराशीव तालुका काँग्रेस कमिटीच्या सहसचिवपदी इमाम शेख यांची निवड

धाराशीव (प्रतिनिधी):
धाराशीव तालुका काँग्रेस कमिटीच्या सहसचिवपदी बोरगाव राजे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते इमाम शेख (पेटेल) यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, माजी मंत्री तथा आमदार अमितजी विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष धीरज आप्पासाहेब कदम-पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद जीवनराव वीर यांच्या हस्ते निवडीचेपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. निवडपत्रात नमूद केल्याप्रमाणे, पक्ष बळकटीसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी इमाम शेख यांनी पुढाकार घेऊन कार्य करावे, तसेच पक्षाच्या विचारधारेनुसार सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढा देत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल इमाम शेख यांचे विविध स्तरांवरून अभिनंदन होत असून, त्यांनी पक्षाच्या कार्यात प्रामाणिकपणे योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुका काँग्रेस कमिटीला उर्जा आणि बळ मिळणार असल्याचा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close