पती-पत्नीने केली एकास बेदम मारहाण, मोघा येथील घटना

लोहारा (जि. धाराशिव): शेतातील बांधवरून जाणाच्या कारणावरून पती-पत्नीने मिळून एकास जबर मारहाण केल्याची घटना लोहारा तालुक्यातील मोघा बुद्रुक येथे घडली आहे. याप्रकरणी पती-पत्नी विरोधात लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोहारा तालुक्यात मोघा बुद्रक व मोघा खुर्द हे दोन गावे आहेत. या दोन्ही गावांचा शिवार एकमेकांशी जोडलेला असल्याने मोघा बुद्रुक येथील पंडित शामराव गरगडे व मोघा खुर्द येथील राम शंकर गरगडे यांची शेती आहे. १० ऑक्टोंबर रोजी पंडित गरगडे (वय ३७ रा. मोघा बुद्रुक) हे शेताच्या बांधावरून जात होते. त्यावेळी आमच्या बांधावरून का जात आहेस, असे म्हणत आरोपी राम शंकर गरगडे, मुक्ताबाई राम गरगडे (रा.मोघा खुर्द) या दोघा पती-पत्नीने मिळून पंडित गरगडे यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पंडित गरगडे यांनी बुधवारी ११ ऑक्टोंबर रोजी लोहारा पोलिसांत फिर्याद दिल्यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- मारहाणप्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात सहा जणाविरोधात गुन्हा दाखल
तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटी येथील आरोपी दत्ता शंकर साखरे, शिवाजी शंकर साखरे, शंकर लक्ष्मण साखरे, शांताबाई शंकर साखरे, सविता शिवाजी साखरे, प्राजक्ता दत्ता साखरे (सर्व रा. वडगाव काटी ता. तुळजापूर) यांनी वडगाव काटी शिवार शेत गट नं 141 येथे फिर्यादी शुभम शाहु साखरे, (वय 23 ) यांना नमुद आरोपींनी बांध फोडल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच लक्ष्मी साखरे, सुरेखा साखरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या शुभम साखरे यांनी दि.11.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149अन्वये गुन्हा नोंदवला आहे.




