पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा भाजपच्या वतीने सत्कार

लोहारा (जि. धाराशिव): धाराशिव जिल्ह्माचे नूतन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा लोहारा तालुका भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. राज्यातील पालकमंत्र्यांच्या निवडी नुकत्याच झाल्या आहेत. धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रीदी शिवसेनेचे प्रतापराव सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत मित्रपक्ष असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे. पालकमंत्री सरनाईक यांचा धाराशिव जिल्ह्यात दोन दिवस मुक्काम होता. सोमवारी 27 जानेवारी रोजी लोहारा तालुका भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सरनाईक यांची भेट घेऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष इक्बाल मुल्ला, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, शिवसेनेचे राजेंद्र माळी, संजय चुंगे आदी उपस्थित होते.





