राजकिय

ग्रामपंचायत सदस्य मोरे यांचा शिवसेनेत प्रवेश

लोहारा (जि. धाराशिव): लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य पवन मोरे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला आहे. उमरगा येथे शनिवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला. धाराशिव जिल्हाचे युवानेते किरण गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, उमरगा तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे, लोहारा तालुका प्रमुख जगन पाटील, परवेज तांबोळी, शेखर पाटील, फजल कादरी, बालेपीर शेख, राजेंद्र माळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close