ग्रामपंचायत सदस्याची सास्तूर पोलिस ठाण्यात गळफास लावून आत्महत्या

लोहारा (जि. धाराशिव): सास्तूर येथील औटपोस्ट पोलिस ठाण्यातील आवारात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास लावून एका विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (ता. २६) घडली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचा प्रकार पोलिस ठाण्याच्या आवारात घडल्याने नागरिकांत उलटसूलट चर्चा केली जात आहे.
तालुक्यातील मुर्शदपूर येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कमलाकर घोडके (वय ४२) हे कामानमित्त सास्तूर येथे आले होते. दुपारच्या सुमारास त्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील असा परिवार आहे. दरम्यान, मयतत घोडके यांची माकणी येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणाची पोलिसांत नोंद झाली नाही. याबाबत पोलिसांना विचारणा केली. मात्र, त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

