सेवानिवृत्त परिचारिका श्यामल भालेराव यांचा आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सत्कार

लोहारा (जि. धाराशिव): येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारीका श्यामल भालेराव या सेवानिवृत्त झाल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करून निरोप देण्यात आला. आरोग्य केंद्रातील सभागृहात बुधवारी (ता. २९) सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी रहीम शेख, डॉ. धीरज सोमवंशी, डॉ. गणेश मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिचारीका श्यामल भालेराव यांचा सत्कार करण्यात आहे. भालेराव यांनी परिचारिका म्हणून गेली ३९ वर्ष आरोग्य विभागात कार्यरत होत्या. त्यांनी विविध ठिकाणी आरोग्य सेवा देत शासनाच्या विविध उपक्रमाची प्रभावीपणे अमंलबजावणी केली आहे. परिचारीका पदावरून त्या निवृत्त झाल्या आहेत. यावेळी आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांनी भालेराव यांचा सत्कार करून निरोप दिला. यावेळी संजय शिंदे, संतोष कागे, उध्दव काळे, प्रभावती माने, वर्षा सुरवसे, रूपाली घोंगडे, कोमल भालेराव, शीतल पांचाळ, अल्का पाटील, गुलाब क्षीरसागर, किशोर डोईजोडे, सारंग गाटे, अजीम शेख, महादेव चांदने, किशोर जाधव, महादेव घोंगडे, संजय गुरव, बालाजी साळुंके, एकनाथ देडे, बाळासाहेब वेदपाठक, अभिजीत गायकवाड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

