नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा प्रवीण पवार जिल्हस्तरीय कुस्ती स्पर्धेत अव्वल
लातूर येथील विभागीय स्पर्धेसाठी झाली निवड

लोहारा (जि. धाराशिव): शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवीण लिंबराज पवार याने धाराशिव येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला असून त्याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा धाराशिव येथील श्री तुळजाभवानी स्टेडियमच्या मैदानावर शनिवारी १६ सप्टेंबर रोजी पार पडल्या. १७ वर्षे वयोगट ६५ किलो वजन गटात नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रवीण पवार व परंडा येथील मल्ल चंद्रकांत फडतरे यांच्यात कडवी झुंज झाली. अखेर फडतरे या मल्लास आसमान दाखवत पवार याने बाजी मारली आणि जिल्हास्तराव प्रथम क्रमांक मिळविला. आता त्याची लातूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे सचिव, शंकरराव जावळे-पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे-पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या प्राचार्या उर्मिला पाटील, पर्यवेक्षक भास्कर जाधव, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रशांत काळे, क्रीडा विभाग प्रमुख, नागनाथ पांढरे यांनी विजेता खेळाडू प्रवीण पवार याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. लक्ष्मीकांत कुलकर्णी, प्रा राजेशा अष्टेकर, प्रा. सुनील बहिरे, प्रा. राजेंद्र साळुंके, दत्ता जावळे-पाटील, प्रा. विजय उंबरे, प्रा. मुकुंद रसाळ, प्रा. ज्ञानदेव शिंदे, प्रा. विठ्ठल कुन्हाळे, प्रा. विष्णुदास कलमे, प्रा. उद्धव सोमवंशी, प्रा. सचिन शिंदे, प्रा. गणेश कांबळे, प्रा. विद्यासागर गिरी, बालाजी इरूदे, अंकुश शिंदे, काकासाहेब, आनंदगावकर, प्रा. नारायण आनंदगावकर, प्रा. धनराज धनवडे तसेच लोहारा तालुका क्रीडा संयोजन समिती अध्यक्ष गोपाळ सुतार, सचिव मुकेश सोमवंशी आदी उपस्थित होते.





