माजी सैनिक हरिश्चंद्र सूर्यंवशी यांनी उंडरगाव येथील अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळेला केली मदत

लोहारा (जि. धाराशिव): माजी सैनिक हरिश्चंद्र माणिकराव सूर्यवंशी (तुळजापूर) यांनी स्वखर्चाने
लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील अंगणवाडीस ४० हजार रूपयांचे गेट व जाळीचे कंपाऊंड बांधून दिले. उंडरगाव येथील अंगणवाडीत विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. परंतु अंगणवाडीस कुठलीच संरक्षण कवच नव्हते. याबाबत बबनजी महाराज यांनी माजी सैनिक हरिश्चंद्र सूर्यवंशी यांच्याकडे अंगणवाडीच्या कंपाऊंडसाठी शब्द टाकला. या शब्दाला मान देऊन त्यांच्या सूचनेनुसार माजी सैनिक हरिश्चंद्र सूर्यवंशी यांनी ४० हजार रूपयांच्या स्वखर्चातून अंगणवाडीला जाळीचे कंपाऊंड व गेट बसवून दिले. तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शैक्षणिक साहित्यासाठी तीन हजार रूपये येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केले. अंगणवाडीस मदत केल्याबद्दल माजी सैनिक हरिश्चंद्र सूर्यवंशी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी बबनजी महाराज, मुख्याध्यापक माळवदकर, अंगणवाडी शिक्षिका सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

