
लोहारा (जि. धाराशिव): परभणी येथे संविधान उद्देशिकेची नासधूस करून अवमान केल्याच्या घटनेतचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रोजगार आघाडीकडून निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देऊन आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले की, संपूर्ण देशभरात भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ठीकठिकाणी विविध सामाजिक उपक्रमाद्वारे संविधानाचा गौरव केला जात असताना परभणी येथे मात्र केवळ द्वेशभावनेतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी लावण्यात आलेली संविधान उद्देशिकेची नासधूस केली करण्यात आली. हा प्रकार निंदणीय आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत असून संबंधित गुन्हेगारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर यांना देण्यात आले. रिपाइं रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, सचिव तिम्मा माने, शरद मस्के लोहारा तालुका अध्यक्ष महादेव वाघमारे, केशव सरवदे, शहराध्यक्ष संघर्ष सोनवणे, ज्ञानेश्वर भालेराव, काकासाहेब भंडारे, गजेंद्र डावरे, तुकाराम कदम, कलाप्पा दुपारगुडे, सर्जेराव बनसोडे, शंकर गवळी युवराज सूर्यवंशी, राज भंडारे, ओम भंडारे, आण्णाराव कांबळे, केशव सरवदे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

