न्यू व्हिजनच्या विद्यार्थ्यांची किल्ले रायगडावर शैक्षणिक सहल

लोहारा (जि. धाराशिव): शहराती न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलची शैक्षणिक सहल दिनांक 03 ते 05 फेब्रुवारी दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे दीन – दलित यांच्या हक्क आणि न्यायासाठी लढले ते म्हणजे महाडचे चवदार तळे येथील पाण्यासाठी केलेले महाडचे सत्याग्रह केलेले भूमी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी ऐतिहासीक किल्ले रायगड, शिवरायांची समाधीस्थळ, किल्ल्यावरील राणीवसा, भव्य बाजारपेठ, हत्ती तलाव, चित्तद्वार, महादरवाजा, जगदीश्र्वराचे मंदिर, पाचाड येथील,राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची समाधीस्थळ, राजवाडा, निसर्ग सोदर्याने नटलेले आणि फेसाळलेले श्रीवर्धन – हरिहरेश्वर बीच व समुद्र किनारे, छ. शिवरायांच्या कल्पनेतून उभारलेले आरमार म्हणजेच समुद्री किल्ला, अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसलेल्या मुरूड बंदराजवळ जंजिरा हा जलदुर्ग एका अंडाकृती खडकावर उभे असलेले तसेच भारताच्या समुद्र किनाऱ्यावरील अतिशय मजबूत असा जलदुर्ग मुरूड – जंजिरा किल्ला, भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची कलालबांगडी तोफ, घोड्याच्या पागा, गोड्या पाण्याचा तलाव, सदर, अनेक तिपदरी गोलाकार 19 बुरुज, सुरुलखानचा वाडा, पोर्तुगीज, मराठा व ब्रिटीश यांनी हा किल्ला जिंकण्याचा अनेकदा प्रयत्न केला परंतु हा किल्ला अभेद्य असल्याने कोणीच हा किल्ला कधीच जिंकू शकला नाही. यावेळी अथांग समुद्र व समुद्रात जहाजाचा व बोटीचा प्रवास केला. या सहलीत अतिशय कठीण असलेले भोरचे वरण घाट आणि ताम्हिणी घाट या घाटातून प्रवास केला. अशा सर्व अद्भुत आणि ऐतिहासीक ठिकाणास भेट देवून तेथील स्वराज्य स्थापनेत अतिशय मोलाचा वाटा असलेल्या या सर्व आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातील समृद्ध वास्तू शाळेतील विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सहलीदरम्यान, पाहून त्यांची सविस्तर माहिती घेतली, हि सहल म्हणजे आमच्यासाठी शैक्षणिक सहल नसून आमच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण व अनुभव असल्याचे विद्यार्थ्यानी आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी या वर्षी छ. शिवरायांचे राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत असल्याची माहिती श्री जाधव सर यांनी विध्यार्थ्यांना दिली. या सहलीत स्कुलचे प्राचार्य श्री शहाजी जाधव, इतिहास संशोधक व प्रा. यशवंत चंदनशिवे, सहल प्रमुख श्री सिध्देश्वर सुरवसे, श्री व्यंकटेश पोतदार, मिस मीरा माने, मिस माधवी होगाडे, मिस अर्चना सोणके, मिस अनिता मनशेट्टी, व्यवस्थापक श्री गणेश माळी, श्री नारायण देवकर, बस चालक श्री जावेद पठाण यांच्यासह स्कुलमधील इयत्ता पहिली ते आठवीचे विध्यार्थी सहभागी झाले होते.




