ईतर

जळकोट आरोग्य केंद्राचे डॉ. सातपुते उच्च शिक्षणासाठी रवाना: कर्मचाऱ्यांकडून भावनिक निरोप

संजय रेणुके / जळकोट (जि. धाराशिव):
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विष्णू सातपुते यांची एमडी या उच्च शिक्षणासाठी वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (दि. २) डॉ. सातपुते यांचा यथोचित सत्कार करून भावनिक निरोप देण्यात आला. डॉ. सातपुते हे जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नऊ ऑगस्ट २०१९ रोजी रूजू झाले. तेव्हांपासून आजपर्यंत त्यांनी अनंत अडचणीवर मात करून कर्मचाऱ्यांची संख्याबळ अपुरे असतानाही कोरोना सारख्या महाभयंकर महामारीच्या विळख्यातून नागरिकांची अलगद सुटका केली. मनुष्यबळ कमी असताना कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडलेला असतानाही डॉ. सातपुते यांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करून आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या तब्बल १८ गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र सेवा बजावली. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडूनही डॉ. सातपुते यांच्यासह संपूर्ण टीमवर कौतुकाची थाप पडली आहेच. प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या असतानाही त्या समजून घेऊन कर्मचारी कोणत्याही प्रकारे दुखावले जाणार नाहीत, याची वेळोवेळी दक्षता घेतल्यामुळेच त्यांना कर्मचाऱ्यांनीही तितक्याच तोडीची साथ दिली. आता त्यांची वर्धा येथे एमडी या उच्च्य शिक्षणासाठी निवड झाली आहे. येथील प्राथमिक केंद्रात निरोप समारंभ झाला. कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्येकांचे डोळे पाणावले होते. अशा या नागरिकांच्या देवदूतास तथा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबप्रमुखास त्यांचे वडील श्री. विठ्ठल, आई सौ. कलावती, सौभाग्यवती तेजस्विनी व अवघ्या तीन महिन्याच्या सुकन्येच्या साक्षीने कर्मचाऱ्यांकडून डॉ. सातपुते यांचा फेटा, शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन भावनिक निरोप देण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संजय रेणुके उपस्थित होते. संजय रेणुके व अंबव्वा महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कस्तुरा कारभारी यांनीही डॉ. सातपुते यांचा फेटा, शाल, निरोपाचा श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांनी केलेल्या सेवेबद्दल ऋण व्यक्त केले. तसेच नुकत्याच दोन महिन्यापूर्वी आरोग्य केंद्रात नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधिकारी मधुरा ढोले यांचाही कर्मचाऱ्यासह पत्रकार संजय रेणुके यांनी फेटा, शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागताचा सत्कार केला. त्याचबरोबर आरोग्य केंद्रातीलच सिस्टर श्रीमती गोकर्ण ढगे, यांची एल. एच. व्ही. म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचाही कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या भावनिक प्रसंगी सत्काराला उत्तर देताना डॉ. विष्णू सातपुते यांनीही कर्मचाऱ्यांसह पत्रकार संजय रेणुके, सामाजिक कार्यकर्त्या कस्तुरा कारभारी यांनी सत्कार केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यातच माझ्या सेवा कालावधीत ग्रामस्थांसह, लोकप्रतिनिधी, कर्मचारी, पत्रकार बांधवांचे आभार मानताना भावनिक तर झालेच होते. याप्रसंगी आरोग्य केंद्रातील अधिकारी डॉ. बर्मा, डॉ. नाझिया शेख, डॉ. मधुरा ढोले, औषध निर्माता चंद्रकांत व्हनाळे, आरोग्य सहायक ज्ञानेश्वर लग्गड, मुसाखान पठाण, अण्णाराव कोळगे, प्रयोगशाळा सहाय्यक महादेव धरणे, सहायिका पायल जीवन गुळे, आरोग्य सहायक वीरभद्र हसुरे, स्वप्निल मोगरकर, डी. जे. जगताप, माजी सैनिक तथा परिचर सुरेश भालेराव, रुग्णवाहिका चालक नारायण कदम ( वाडीकर ), सचिन काळे, परिचर प्रवीण कदम, नागरिक अंकुश सावंत, अहमद शेख, ज्ञानेश्वर पात्रे, गटप्रवर्तिका बालिका दिनकर कदम, ज्योती माशाळकर, शोभा काळे, आशा कार्यकर्ती मनीषा गायकवाड, वैशाली कदम, वनमाला सुरवसे, शालिनी कडते आदीं कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close