इंद्रायणी संस्थेकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

लोहारा (जि. धाराशिव): लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, ब्रिगेडीयर डॉ. शिवाजी भालेराव बहुउद्देशीय सामाजिक संस्था, श्वास संस्थेच्या वतीने हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह संगीत साहित्याचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी परिस्थितीशी झगडत शिक्षण घेत आहेत. शिक्षणात त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, ब्रिगेडीयर डॉ. शिवाजी भालेराव बहुउद्देशीय सामाजिक संस्था, श्वास संस्थेने लोहारा तालुक्यातील गरिब, होतकरू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना शालेय साहित्याचे व संगीत साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लोहारा तालुक्यातील तवाशीगड, सालेगाव येथील निवड केलेल्या गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना सोमवारी (ता. २४) शालेय साहित्य व संगीत साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवाय गरीब विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचणीमुळे नुकसान होणार नाही, याची जबाबदारी संस्थेच्या वतीने घेतली जाईल, असे प्रतिपाद इंद्रायणी संस्थेचे सचिव गोपाळ माने यांनी केले. यावेळी डॉ. हरिष भालेराव यांची उपस्थिती होती.




