शैक्षणिक

शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या राज्य सचिवपदी दत्तू गडवे

उमरगा (जि. धाराशिव): महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या कार्यकारी मंडळाची सर्वसाधारण सभा दि. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी कल्याण येथील के. एम. आग्रवाल महाविद्यालयात पार पडली. यावेळी कार्यकारी मंडळात विभागवार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाच्या सचिवपदी मुरुम जि. धाराशिव येथील माधवराव पाटील महाविद्यालयातील दत्तू विठ्ठलराव गडवे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे. यावेळी राज्य कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी अकोला येथील रा. जा. बढे, सरचिटणीसपदी कल्याण येथील डॉ. आर. बी. सिंह, कार्याध्यक्षपदी पुणे येथील शशिकांत कामठे व कोषाध्यक्षपदी कल्याण येथील अनिल लबरे यांची फेर निवड करण्यात आली तर नांदेड येथील गोविंद जोशी यांची कार्याध्यक्षपदी सर्वानुमते नविन निवड करण्यात आली.
तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाच्या उपाध्यक्षपदी, नळदुर्ग जि. धाराशिव येथी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे धनंजय पाटील, सचिवपदी मुरुम जि. धाराशिव येथील माधवराव पाटील महाविद्यालयातील दत्तू विठ्ठलराव गडवे, सहसचिवपदी जालना येथील विजय गौड, विभागीय सचिव पदी बीड येथील महारुद्र शेळके, महीला संघटकपदी कळंब येथील सारिका पडवळ, प्रमुख सल्लागारपदी बीड येथील राजकुमार काळे, तर सदस्यपदी संभाजीनगर येथील विनय कुलकर्णी, जालना येथील राजेंद्र ठोबरे व सभाजीनगर येथील सत्यवान माळी यांची निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close